Header Ads Widget

Responsive Advertisement

लालकृष्ण आडवाणी यांची प्रकृती खालावली



 नवी दिल्ली: देशाचे माजी उपपंतप्रधान तथा भाजपाचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू असून एम्सच्या जेरियाट्रिक विभागाच्या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

लालकृष्ण अडवाणी यांच्या प्रकृतीबाबत अधिक अपडेट्स अद्याप समोर आलेले नाहीत. अडवाणी यांचं मेडिकल बुलेटिन एम्सचे डॉक्टर आणि वैद्यकीय तज्ज्ञ लवकरच जारी करू शकतात. महत्त्वाची बाब म्हणजे, याच वर्षी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारत सरकारनं देशातील सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच, भारतरत्न प्रदान केला होता.

Post a Comment

0 Comments